‘जेएनयू’त कन्हैया कुमारला 10 हजारांचा दंड, उमर खालिद एका सेमिस्टरसाठी निलंबित

April 26, 2016 8:41 AM0 commentsViews:

नवी दिल्ली – 26 एप्रिल : जवाहरलाल नेहरु विद्यापीठ प्रशासनाकडून कन्हैया कुमार, उमरसह अन्य तिघांवर कारवाई कारवाई करत ठोस पाऊल उचलले आहे. तसंच कन्हैया कुमारसह 6 जणांवर दंडात्मक कारवाई कऱण्यात आली आहे.जेएनयू विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष कन्हैय्या कुमारला10,000 रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. तर उमर खालिदला 20,000 हजार रुपयांचा दंड आणि एका सत्र परिक्षेसाठीसाठी निलंबित करण्यात आले आहे.479115-kanhaiya-kumar

9 फेब्रुवारी रोजी जेएनयूमध्ये झालेल्या गोंधळानंतर जेएनयू प्रशासनाने ही कारवाई केलीये. आषुतोष याला जेएनयूमधील हॉस्टेलमध्ये एका वर्षासाठी येण्यास बंदी देखील घालण्यात आली आहे. कन्हैया कुमारसह जेएनयूमधील अभाविपचा नेता सौरभ शर्माला देखील 10 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. तर अनिर्बान भट्टाचार्यला 15 जुलैपर्यंत जेएनयूमध्ये येण्यास मनाई करण्यात आली आहे. 5 वर्षांपर्यंत जेएनयूमधील कोणत्याच कोर्ससाठी अनिर्बान भट्टाचार्यला प्रवेश घेता येणार नाही.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा