स्पॉनर्सशिपचा फेरविचार करण्याची सहाराची भूमिका

March 24, 2010 10:38 AM0 commentsViews: 1

24 मार्चआयपीएलमध्ये पुण्याची टीम विकत घेतल्यानंतर आता भारतीय क्रिकेट टीमच्या स्पॉनर्सशिपचा फेरविचार करण्याची शक्यता सहारा ग्रुपने व्यक्त केली आहे. सहारा ग्रुपचे प्रमुख सुब्रतो रॉय यांनीच तशी शक्यता वर्तवली आहे. तब्बल 1700 करोड रुपयांना सहारा टीमने आयपीएलमधील पुणे टीम विकत घेतली आहे. याअगोदर सहाराने भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थातच बीसीसीआय बरोबर चार वर्षांसाठी करार केला होता. टीम इंडीयासाठी 400 करोड रुपयांचा हा करार करण्यात आला होता. या कराराची मुदत डिसेंबर 2009 मध्येच संपली होती. पण बीसीसीआयला स्पॉनर्स मिळत नसल्याने सहारा ग्रुपला सहा महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली होती. पण आता या निर्णयामुळे भारताच्या पुरुष आणि महिला टीमवर मात्र बेसहारा होण्याची वेळ येऊन ठेपली आहे. त्यातच आयपीएलला मिळालेल्या प्रचंड ग्लॅमर आणि प्रतिसादामुळे बीसीसीआयला नवीन स्पॉनर्स मिळणे कठीण असल्याचेही बोलले जात आहे. यामुळे बीसीसीआयवर मात्र मोठी नामुष्कीची वेळ आली आहे. असे असले तरीही इतर खेळांना दिली जाणारी स्पॉन्सरशिप बंद करणार नसल्याचे सहारा ग्रुपने स्पष्ट केले आहे.

close