दुष्काळाने मांडला तमाशा कलावंताचा ‘खेळ’ !

April 26, 2016 12:49 PM0 commentsViews:

राजेंद्र हुंजे, येरमाळा, उस्मानाबाद – 26 एप्रिल : मराठवाड्यातल्या दुष्काळाच्या झळांमध्ये केवळ शेतकरीच नाही तर व्यावसायिकांनाही त्याचे परिणाम सोसावे लागताहेत. याच दुष्काळाचा फटका तमाशा केंद्रांमध्ये आपली कला सादर करणार्‍या कलाकारांनाही बसतोय.tamasha_osmanbad

हे आहे उस्मानाबाद जिल्ह्यातल्या चोराखळी गावातलं कालिका कला केंद्र…गेल्या सात वर्षांपासून इथल्या तमाशा कलावंतीण अनेकांचं मनोरंजन करण्याचं काम करताहेत. पण यंदाच्या दुष्काळाचा फटका या कलाकारांनाही सोसावा लागतोय.

या कलाकेंद्राकडे दुष्काळामुळे ग्राहकांनी पाठ फिरवलीय. ‘तरीही पोटासाठी नाचते मी, पर्वा कुणाची…’असं म्हणत या तमाशा कलावंतीण मोजक्याचं ग्राहकांसाठी सुद्धा आपलं नाच गाणं करतात. अशा दुष्काळी परिस्थितीत कलाकेंद्राच्या थिएटर मालकांनाच या कलाकारांना सांभाळण्याची वेळ आली आहे.

यात्रा काळ असूनही तमाशा कला केंद्रामध्ये मात्र गर्दी काहीच नाही. त्याचा फटका तमाशा कलाकारांसोबत हॉटेल व्यवसायालाही बसलाय.

दुष्काळ म्हणजे केवळ पाणीटंचाई नाही, तर त्यानिमित्तानं त्याच्या भोवताली उभे राहणारे असे असंख्य प्रश्न आहेत.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा