देशभरात रामनवमीचा उत्साह

March 24, 2010 10:48 AM0 commentsViews: 6

24 मार्चआज रामनवमी आहे. त्यानिमित्त शिर्डीत तीन दिवस चालणार्‍या रामनवमी उत्सवाला आजपासून सुरुवात झाली. शिर्डीच्या मंदिरात झालेल्या मध्यान्हीच्या आरतीला भाविकांनी मोठी गर्दी केली. तुळशीबागेत गर्दीपुण्यातही रामनवमी उत्साहात साजरी करण्यात आली. पुण्यातील तुळशीबागेतील राममंदिरात पारंपरिक पद्धतीने रामनवमी साजरी करण्यात आली. यावेळी मंदिरात भजन-कीर्तन आणि जप सुरू होता. तुळशीबागेतील हे मंदिर पुण्यातील जुन्या मंदिरांपैकी एक आहे. मंदिरातील राम- सीतेच्या मूर्तींना खास सजावट करण्यात आली होती. काळाराम मंदिरात उत्सवनाशिकच्या काळाराम मंदिरात रामजन्मोउत्सव सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्ताने मंदिरात घंटानाद, शंखध्वनी यांच्या तालावर भजने रंगली. यावेळी मंदिरातील मूर्तीला दागिने, रेशमी वस्त्र आणि फुलांनी सजवण्यात आले. बंदोबस्ताचा भाग म्हणून मंदिरात सगळीकडे सीसीटिव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत.रामटेकला भाविकांची गर्दीनागपूर जिल्ह्यातील रामटेक इथेही भाविकांनी श्रीरामाच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केली. येथील राम मंदिराच्या पायथ्याशी साकारलेले रामायणातील प्रसंग पाहण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती.

close