एलटीटी स्टेशनवर पोलिसांकडुनच प्रवाशांची लुट, सर्व प्रताप सीसीटीव्हीत कैद

April 26, 2016 4:12 PM0 commentsViews:

सूरज ओझा, मुंबई – 26 एप्रिल : सध्या लोकमान्य टिळक स्थानकावर एक पैसे लुबाडणार्‍यांची टोळी सक्रिय आहे. ती टोळी तुमची बॅग चेक करते, तुमचे मोबाईल चेक करते आणि त्यातुन पैसे उकळते. तुम्ही दोषी असाल किंवा नसाल पण तुमच्यावर कारवाई देखील करते. ही टोळी आहे लोहमार्ग पोलिसांची जे प्रवाश्यांची लुट करून त्यांचे पैसे उकळत आहेत.

LTT STATION FOOTAGE

लोकमान्य टिळक टर्मिनसवर भ्रष्टाचाराचा आवक जावक कशी सरू आहे ते सीसीटीव्हीत स्पष्ट दिसतंय. ही लूट करणारे दुसरे तिसरे कोणी नसून, ज्यंाच्यावर आपण विश्वास ठेवून बिनधास्त असतो असे हे पोलीस. फलाट क्रमांक 3च्या पोल नंबर 3 जवळ असलेल्या सीसीटीव्ही कॅमेर्‍यात हे सारं कैद झालंय. लोहमार्ग पोलिसांची ही लूट करण्याची मोडस आपणाला या सीसीटीव्हीमधून दिसत आहे.

राज्यासह देशाच्या अनेक भागातून शेकडोने प्रवासी इथं ये- जा करत असतात. स्टेशनवर त्यांच्या सामानाची तपासणी केली जाते. त्यात हे संशयास्पद असल्याचं सांगून प्रवाशांना घाबरवलं जातं. तुमच्यावर केस टाकू, अटक करु अशी भीती लोकांना दाखवली जाते. त्यांच्याकडे पैसे मागितले जातात आणि ते न दिल्यास त्यांना मारहाण केली जाते. सातत्यानं लोकमान्य टिळक टर्मिनसवर हा प्रकार सर्रासपणे सुरू आहे. खाकीनेच विश्वासघात केला तर मग दाद कोणाकडे मागायची? आणि तक्रार करायची तर कोणाकडे करायची? असा प्रश्नही प्रवाशांना पडला आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा