मोदी होणार एसआयटीसमोर हजर

March 24, 2010 11:04 AM0 commentsViews: 2

24 मार्च गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी 27 मार्चला एसआयटीपुढे हजर राहणार आहेत. एसआयटीच्या समन्सला मोदींनी उत्तर दिले आहे. 27 मार्चला एसआयटीपुढे उपस्थित राहू, असे मोदी यांनी कळवले आहे. गुजरातमध्ये 2002 मध्ये उसळलेल्या दंगलीसंदर्भात चौकशी करण्यासाठी सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने एसआयटीची स्थापना करण्यात आली. मात्र हे प्रकरण सुप्रीम कोर्टात प्रलंबित असतानाच, एसआयटीच्या चौकशीसंदर्भात मोदी यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

close