मिठाई व्यवसायालाही दुष्काळाचा फटका!

April 26, 2016 8:14 PM0 commentsViews:

राजेंद्र हुंजे, लातूर – 26 एप्रिल :  लातूर जिल्ह्यात दुधाचं उत्पादन निम्म्यानं घटलं आहे. त्याचा परिणाम पेढे, बासुंदी तयार करून विकणार्‍या व्यावसायिकांवरही झाला आहे. पण ऐन दुष्काळात किमान दूध विकून तरी शेतकर्‍याच्या पदरात दोन पैसे पडत आहेत, हीच समाधानाची बाब आहे.

लातूर जिल्ह्यातल्या उजनी गावातील बासुंदी प्रसिद्ध आहे. दररोज या ठिकाणी येऊन थांबणार्‍या बस मधील प्रवासी इथे बासुंदीचा आस्वाद घेतल्याशिवाय पुढे जात नाहीत. या व्यावसायिकांनी यापूर्वी अनेकवेळा दुष्काळाचे चटके सहन केले. मात्र यंदाच्या दुष्काळात ब्रँडेड कंपन्याच्या पिशव्यातलं दुध त्यांच्या मदतीला असल्याने दुधाचे प्रमाण फार काही घटल नाही, असा व्यावसायिकांचा दावा आहे.

MITsaHAI

या पट्ट्यातील ऊसाचं पीक कमी झालं आहे. पण शेतकर्‍यांनी दुध उत्पादनाकडे मात्र अजिबात पाठ फिरवली नाही. दररोज येऊन या हॉटेलला शेतकरी दूध विक्री करतो. सध्या दुष्काळात जो काही आधार आहे, तो या दुभत्या जनावरांचाचं, असं शेतकर्‍यांच म्हणणं आहे.

शेतकर्‍याला ऐन दुष्काळात दुग्ध उत्पादनाचाच सहारा आहे. त्यामुळे बासुंदी बनवणार्‍या हॉटेल मालकांचीही गरज भागतेय आणि शेतकर्‍यालाही एक जोडधंडा मिळाल्याचं हॉटेल मालक सांगत आहेत.

दूधाचं उत्पादन घटलं, चारा महाग झाला असला तरी पशुधन विकायचं नाही. या भूमिकेवर बळीराजा ठाम आहे. दुष्काळाच्या झळा सोसाव्या लागल्या तरी चालतील, जनावरं जगवायचीच असा निर्धार शेतकर्‍यांनी केला आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा