‘…तर महिलांना शिट्‌ट्या मारल्या जातील’

March 24, 2010 11:11 AM0 commentsViews: 4

24 मार्चमहिला आरक्षण विधेयक मंजूर झाले, तर संसदेत येणार्‍या महिलांना शिट्‌ट्या मारल्या जातील, असे धक्कादायक विधान सपाचे अध्यक्ष मुलायमसिंग यांनी केले आहे. राम मनोहर लोहिया यांच्या 100 व्या जन्मदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात मुलायमसिंगांनी हे तारे तोडलेत. महिला आरक्षण विधेयकाला मुलायम, लालूप्रसाद आणि शरद यादव यांचा संसदेत विरोध आहेच. शिवाय आता अशी विधाने करुन, त्यांनी बाहेरही विधेयकाला विरोध सुरूच ठेवण्याचे ठरवले आहे. दरम्यान काँग्रेसने मुलायम यांच्या या विधानावर टीका केली आहे. किमान मुलायमसिंग सारख्यांनी तरी जबाबदारीचे भान ठेवावे, असे काँग्रेसने म्हटले आहे.

close