दाऊदला भारतात आणणं शक्य आहे का ?

April 26, 2016 10:49 PM0 commentsViews:

 
मुंबई – 26 एप्रिल :  दाऊद इब्राहिमला गँगरिन झाल्याची बातमी IBN लोकमतने दिली आणि आज दिवसभर सगळीकडे तोच चर्चेही झाली. पण IBN लोकमतशी फोनवरून बोलताना छोटा शकीलने दावा केलाय की दाऊदची तब्येत ठीक आहे. त्यातच मुंबईत एक नवं पुस्तक प्रकाशित होतंय ज्यात दाऊदचा आजपर्यंत प्रकाशित न झालेला एक फोटो वापरण्यात आला आहे.

Dawood Ibrahim123

12 मार्च 1993 च्या दिवशी मुंबईभर असे स्फोट घडवून 257 निष्पाप लोकांचे जीव घेण्यात आले. आणि हे घडवणारा दाऊद इब्राहिम कासकर अजूनही पाकिस्तानातल्या कराची शहरात आरामात जगतोय. पण आता त्याचे सुखात जगण्याचे दिवस संपलेत. कारण त्याला झालंय जीवघेणं गँगरिन. तो जायबंदी झालाय आणि त्याचे पाय कापावे लागणार आहेत, अशी माहिती पाकिस्तानमधल्या विश्वसनीय सूत्रांनी आम्हाला दिलीये. पण ही बातमी आम्ही दाखवल्यावर छोटा शकीलने तिचं खंडन केलंय.

आम्हाला माहिती मिळालीये की कराचीतल्या लियाकत नॅश्नल हॉस्पिटल आणि कंबाइन्ड मिलिटरी हॉस्पिटलमधले डॉक्टर्स त्याच्यावर त्याच्या घरी उपचार करतायत. शिवसेनेने मागणी केलीये की या हॉस्पिटल्सकडून भारताने रिपोर्ट्स मागवावेत.

राज्य सरकारनेही आयबीएन लोकमतच्या बातमीची दखल घेतलीये. सरकार आपल्या पातळीवर माहिती मिळवण्याचा प्रयत्न करतंय. पण दाऊदला भारतात आणणं अशक्य आहे, कारण त्याला पाकिस्तानने 5 स्तरांची सुरक्षा दिली आहे, अशी माहिती विवेक अग्रवाल यांनी त्यांच्या नव्या पुस्ताकातून दिलीये.

या पुस्तकाच्या मुखपृष्ठावर दाऊदचा आजवर कधीही न दिसलेला एक फोटो छापण्यात आलाय. 1993 साली हा फोटो कराचीत काढला होता. त्यानंतरचा त्याचा एकही फोटो उपलब्ध नाही. आज दाऊद 60 वर्षांचा आहे, पण भारताचे गुप्तहेर त्याच्या जवळही पोहोचू शकत नाहीयेत.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा