विंदांना आगळी आदरांजली

March 24, 2010 11:19 AM0 commentsViews: 4

24 मार्चज्येष्ठ कवी विंदा करंदीकर यांचे नुकतेच निधन झाले. साने गुरुजी राष्ट्रीय स्मारक ट्रस्ट आणि पु. ल. देशपांडे कला अकादमीतर्फे काल विंदांना वेगळ्या प्रकारे आदरांजली वाहण्यात आली.किंग लिअरचे शब्द थेट मराठीत… हे जगप्रसिद्ध नाटक विंदा करंदीकरांनी मराठीत आणले….विंदांना श्रद्धांजली वाहण्यासाठी विंदांच्याच पुस्तकातील हे शब्द मुंबईच्या पु. ल. देशपांडे कला अकादमीत पुन्हा एकदा घुमले.निमित्त होते, साने गुरुजी राष्ट्रीय स्मारक ट्रस्टच्या आंतरभारती केंद्रांने आयोजित केलेलेल्या विंदांच्या साहित्य वाचनाच्या कार्यक्रमाचे.विंदांच्या विविध भाषेतील कविता यावेळी अनेक कवींनी सादर केल्या.रवींद्र साठे यांनी गायलेल्या विंदांच्या कवितांनी या कार्यक्रमात वेगळीच रंगत आणली.

close