यवतमाळच्या सोनालीची कविता ‘बालभारती’त !

April 27, 2016 5:00 PM0 commentsViews:

26 एप्रिल : यवतमाळ इथल्या कापरा गावात सहावीत शिकणार्‍या सोनाली फुफरे या विद्यार्थिनीची ‘झाड’ ही कविता बालभारतीच्या नवीन अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात आलीये. तिच्या या कार्याबद्दल सोनालीचं सर्वत्र कौतुक केलं जात आहे.sonali_yavatmal

विद्यार्थ्यांच्या सृजनशीलतेला चालना मिळावी या उद्देशाने राज्य पाठ्यपुस्तक संशोधन मंडळानं यावर्षी पहिल्यांदाच 6 वीतील विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या कविता अभ्यास क्रमात समाविष्ठ करण्या करिता मागितल्या होत्या. त्या नुसार यवतमाळ जिल्ह्यातील कापरा येथील केंद्रीय उच्च प्राथमिक मराठी शाळेत 6 व्या वर्गात शिकणार्‍या 3 विद्यार्थ्यांच्या कविता पाठविल्या होत्या. त्यातील सोनाली फुफ रे या विद्यार्थिनीची ‘झाड’ नावाची कविता सर्वांच्या पसंतीस पडली. ही कविता निसर्गाचा संदेश देणारी आणि निसर्गाबद्दल मुलांच्या विश्वातील भावना सांगणारी आहे. त्यामुळे या कवितेचा 6 व्या वर्गाच्या अभ्यास क्रमात समावेश करण्यात आला. यामुळे सोनाली सोबतच शाळेचं आणि जिल्ह्याचं नावसुद्धा मोठं झालं. ही बातमी समजल्यापासून सोनालीवर अभिनंदनाचा वर्षाव सुरू आहे.

रामचंद्र फुफरे यांच्या तिन्ही मुली अतिशय हुशार आहे . मात्र, मोल मजुरी मुळे मुलींना जिल्हा परिषदेच्या शाळेतच शिकवावं लागत आहे. वर्ग शिक्षिका वैशाली राऊत या सोनालीच्या कविताबद्दल अधिकच जागरूक आहे. त्या तिला वेळोवेळी मार्ग दर्शन करत असतात.

वनिता फुफरे यांना तिन्ही मुलीच आहे. मुलगी सोनाली हिची कविता अभासक्रमात समाविष्ठ करण्यात आल्यामुळे त्या कमालीच्या आनंदी आहे. मुलीच्या यशात शिक्षिकाच मोठा वाट असल्याचा त्या सांगत आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा