भुजबळ काका-पुतण्याच्या कोठडीत वाढ, पंकज भुजबळांविरोधातही अजामीनपत्र वॉरंट जारी

April 27, 2016 4:02 PM0 commentsViews:

26 एप्रिल : मनी लाँड्रिग प्रकरणी माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ आणि त्यांचे पुतणे समीर भुजबळ यांची न्यायालयीन कोठडी वाढवण्यात आली. या दोघांनाही 11 मेपर्यंत न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. तर दुसरीकडे पैशांची अफरातफर प्रकरणी पंकज भुजबळांविरूद्ध अजामीनपात्र वॉरंट ईडी कोर्टाने काढलं आहे.bhujbal family_

मनी लाँड्रिग प्रकरणी छगन भुजबळ आणि समीर भुजबळ यांची आज न्यायालयीन कोठडी संपणार होती. दोघांना आज विशेष ईडी कोर्टात हजर करण्यात आलं. कोर्टाने त्यांची न्यायालयीन कोठडी 11 मे पर्यंत वाढवली तर ईडीने कोर्टात सांगितलं की या प्रकरणी पंकज भुजबळवर ही संशय आहे. ज्यावर कोर्टाने पंकज भुजबळविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी केलंय. या प्रकरणी आणखी दोन आरोपीं म्हणजेच आरोपी क्रमांक 16 ते 49 विरुद्धही अजामीनपत्र वॉरंट जारी करण्यात आलंय. त्यामुळे पंकजा भुजबळांनाही आता ताब्यात घेण्याची शक्यता आहे. छगन भुजबळ आणि समीर भुजबळांना मागील महिन्यात ईडीने अटक केली होती. दोघांनाही मुंबईतील ऑर्थर रोड कारागृहात ठेवण्यात आलंय.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा