बुलडाण्यात 3 महिन्याच्या बाळाची गळा चिरून निर्घृण हत्या

April 27, 2016 7:21 PM0 commentsViews:

बुलडाणा -27 एप्रिल : जिल्ह्यातील नांद्री या गावात मन सुन्न करणारी धक्कादायक अशी घटना घडलीये. एका 3 महिन्याच्या नवजात बालिकेचा गळा चिरून निर्घृण खून करण्यात आलाय.

buldhana44रात्री ही चिमुकली आपल्या आई बरोबर घराबाहेर झोपली असता कुणी अज्ञात व्यक्तीने तिला उचलून नेऊन गळा कापून खून केला . सकाळी उठल्या नंतर जेव्हा ही चिमुकली सकाळी आपल्या आई जवळ आढळून न आल्याने तिची सर्वत्र शोधाशोध सुरू झाली, काही वेळानंतर ही चिमुकली मृत अवस्थेत गावाबाहेर आढळून आली आहे. ह्या चिमुकलीचा गळा कापलेला असल्याने हा खूनच असून नेमका हा खून कोणी आणि कशासाठी केला आहे याचा तपास पोलीस करत आहेत.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा