देशात अन्नधान्यापेक्षा पाण्याची समस्या भीषण -शरद पवार

April 27, 2016 7:36 PM0 commentsViews:

27 एप्रिल : दुष्काळ फक्त महाराष्ट्रात नाहीये, तर देशाच्या 11 राज्यांमध्ये दुष्काळ पडलाय. त्यामुळे आपण यावर राजकारण न करता जनतेसाठी उपाय शोधले पाहिजेत, असं मत राष्ट्रवादीचे खासदार शरद पवार यांनी राज्यसभेत व्यक्त केलं. तसंच देशात अन्नधान्य पुरेसं, पण पिण्याच्या पाण्याची मोठी समस्या असून त्यावर लक्ष दिलं पाहिजे असंही पवार म्हणाले.

pawar_rajasabhaआज राज्यसभेत राष्ट्रवादीचे खासदार आणि अध्यक्ष शरद पवार यांनी दुष्काळाच्या प्रश्न उपस्थित केला. मराठवाड्यासह देशभरात दुष्काळाची परिस्थिती भीषण आहे. देशात सध्या अन्नधान्याची कमी नाहीये. पण, पाण्याची भीषण समस्या आहे, त्यामुळे सर्व लक्ष पाण्यावर केंद्रीत करायला हवं यासाठी कुणी राजकारण करू नये असं परखड मत पवारांनी व्यक्त केलं.

तसंच लातूरमध्ये पाण्याची तीव्र टंचाई असून एखादा पाण्याचा टँकर जरी गावात आला तर सगळे गावकरी त्याला गराडा घालता. एवढंच नाहीतर पाण्यासाठी 144 कलम लावावं लागलं अशी परिस्थिती निर्माण झालीये. लातूरसाठी रेल्वेमंत्री सुरेश प्रभूंनी वेळीच रेल्वेनं पाणी पुरवले याबद्दल पवारांनी त्यांचे आभारही मानले.

सिंचनाचे प्रकल्प देशात 25 वर्षांपासून अर्धवट आहेत. ते सरकारने पूर्ण करावे अशी मागणीही पवारांनी केली. राधामोहन सिंह यांनी महाराष्ट्रच्या साखर कारखान्याबाबत वक्तव्य केलं. पण, उसासाठी पाणी वापरणे चूक नाही असं म्हणत राधामोहन सिंह यांचा मुद्दा पवारांनी खोडून काढला.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा