बांधकामं अधिकृत करण्याचं धोरण अनधिकृतच, कोर्टाची सरकारला चपराक

April 27, 2016 8:13 PM1 commentViews:

मुंबई – 27 एप्रिल : राज्य सरकारने जाहीर केलेल्या अनधिकृत बांधकामं अधिकृत करण्याच्या धोरणाला आज मुंबई हायकोर्टाने केराची टोपली दाखवली. याचबरोबर कोर्टाने अत्यंत कडक शब्दांत सरकारचा समाचार घेतला. हे धोरण बनवण्याची आधी याचा पर्यावरणावर काय परिणाम होईल, याचा साधा विचार तरी सरकारनं केला होता का ?, असा सवाल कोर्टाने उपस्थित केला.

mumbai high court434अनधिकृत बांधकाम अधिकृत करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. त्यामुळे पिंपरी चिंचवड, ठाणे,नवी मुंबईतील दिघावासियांना दिलासा मिळाला होता. तर दुसरीकडे, अनधिकृत बांधकाम करणार्‍या बिल्डरांवर कारवाई न करत निर्णय जाहीर केलाच कसा असा सवाल विरोधकांनी उपस्थित केला होता. राज्य सरकारच्या या धोरणात्मक निर्णयावर मुंबई हायकोर्टात सुनावणी झाली यावेळी हायकोर्टाने राज्य सरकारला चांगलीच चपराक लगावली. पर्यावरणावर काय परिणाम होईल याचा विचार न करता निर्णय घेतलाच कसा ?, असा निर्णय घेण्याआधी शहरांच्या नागरी सुविधेवर किती परिणाम होईल याचा अभ्यास केला का ?, असा सवाल उपस्थित करत अनधिकृत बांधकामांना संरक्षण देण्याचा धोरणाला हायकोर्टाने केराची टोपली दाखवलीये. तसंच सादर केलेल्या आकडेवारीवरूनही कोर्टाने सरकारला झापलं. एकट्या पिंपरीत जर 66 हजार अनधिकृत बांधकामं आहेत, तर राज्यात एकूण अनधिकृत बांधकामं अडीच लाखाहून कमी आहेत, असा दावा तुम्ही कसा करू शकता, अशी विचारणाही कोर्टाने केली.

कोर्टाने काय म्हटलं?

- धोरणाचा पर्यावरणावर काय परिणाम होईल, याचा काडीमात्र विचार सरकारनं केला नाही
-शहरांच्या नागरी सुविधांवर याचा काय परिणाम होईल, याचा विचार सरकारनं केला का?
- सध्याच्या कायद्यांमध्ये सरकारनं आवश्यक बदल केले नाहीत
- हे धोरण एमआरटीपी कायदा आणि विकास नियंत्रण अधिनियमाशी विसंगत आहे
- धोरण आखण्याआधी सरकारनं परिणामांचं मूल्यमापन केलं का?
- एकट्या पिंपरीत 66,000 अनधिकृत बांधकामं आहेत. मग राज्यातल्या अनधिकृत बांधकामांचा आकडा अडीच लाखांपेक्षा कमी, असा दावा सरकार कसा करू शकतं?


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


  • kusum

    sarkarne anadhikrut bandhkam kartana action kaa nahi ghetli teva court aani sarkar kuthe hote, courtane aani sarkarne kadhi vichar kela aahe kaa garib manase kuthe rahtil, tyanchya ayushyavar kay parinam hoil jyani hi gare kharedi keli aahet tyani kiti menat karun paise jamaun aapla ek chotasa ghar asava anadhikrut kaa hoina pan te aapla asava mhanun garib manase ashi ghare karedi kartat jar sarkarla evdic janatechi parva assel tar kaa nahi tyana parvadtil ashi ligal ghare bandhat, dighya made majya aaichaa sudha ghar aahe tila 2 muli aahet ti widow aahe jar sarkar ashya mansanchi ghara todnar tar ti kuthe janar yacha hi uttar mala hava aahe. mi maharashtrachi nagrik aahe aani mala prashna vicharnyacha purna adhikar ahe..
    courtane aani sarkarne uttar dyava ashi majhi vinanti aahe ki jeva hi anadhukrut bandhkama chalu hoti jeva badya rajkarni lokani paise khishat ghatle teva court aani sarkar kuthe hote.. mi eka widow chi mulgi aahe tine jya kashtane amhala shikavla jya kashtane anadhikrut kaa hoina ticha ghar getla yacha mala abhiman aahe.. jar sarkarla evdhich paryavarnachi kalji aahe tar je hiranandani and asle builder jeva dongar phodun jhade kapun construction kartat teva te legal hota aani ji garib loka aaplya chawl todun building banavtat teva te illegal hota.. hech aahe kaa maharashtracha sarkar aani court..