प्रचाराच्या आढाव्यासाठी राष्ट्रवादीकडून एजन्सी

March 24, 2010 11:37 AM0 commentsViews: 4

विनय म्हात्रे, नवी मुंबई24 मार्चनवी मुंबई महापालिकेतील सत्ता काबीज करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा एकदा सज्ज झाली आहे. राष्ट्रवादीने प्रचारादरम्यान चक्क उमेदवारांचा जनमानसातील प्रभाव जाणून घेण्यासाठी तीन एजन्सीज नेमल्या आहेत. प्रचारा दरम्यान सर्व्हे करण्याचा देशातील हा पहिला प्रयोग ठरला आहे.राष्ट्रवादीच्या उमेदवारांनी आपला प्रचार सुरू केला आहे. मात्र मतदार राजाच्या मनात काय आहे, याचा त्यांना अंदाज नाही.म्हणूनच राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्या उमेदवारांच्या प्रचारादरम्यान सर्व्हे करण्यासाठी तीन एजन्सी नेमल्या आहेत.या एजन्सीज विविध वयोगटातील मतदारांना भेटून त्याचा डेली रिपोर्ट राष्ट्रवादीला देतील. या एजन्सीजसाठी काम करणारे नवी मुंबई बाहेरचे आहेत हेही विशेष. सध्या 89 वॉर्डामध्ये या एजन्सी काम पाहत आहेत. आपला उमेदवार कुठे कमी पडत नाही ना, याची चाचपणी करणारा हा देशातील पहिलाच प्रयोग म्हणावा लागेल. नवी मुंबई महापालिका निवडणूक प्रक्रिया सुरू होण्याआधी राष्ट्रवादीने एजन्सी नेमली होती. त्यानुसार उमेदवारांची निवड प्रक्रिया पार पडली. मात्र राष्ट्रवादीने तेवढ्यावर न थांबता, प्रचाराचा आढावा घेण्यासाठीही स्वतंत्र एजन्सी नेमल्या. आता या एजन्सीच्या रिपोर्टनुसार पक्षाकडून उमेदवारांना मार्गदर्शन केले जाईल. मात्र या प्रयोगाचा फायदा पक्षाला किती होतो हे निवडणुकीनंतरच कळेल.

close