अडीच हजार कोटींच्या एफेड्रीन ड्रग्स प्रकरणी तिघांना अटक

April 27, 2016 9:54 PM0 commentsViews:

98arrestठाणे -27 एप्रिल : अडीच हजार कोटींच्या एफेड्रीन ड्रग्स प्रकरणात एव्होन लाइफ सायन्सेस या कंपनीच्या 3 संचालकांना ठाणे गुन्हे शाखेने अटक केली आहे. पुनीत श्रींगी हा या कंपनीत व्यवस्थापक होता त्याच्या वाहनासह त्याला अटक केल्यावर 10 किलो एफेड्रीन ही जप्त करण्यात आले आहे. पुनीतसोबत मनोज जैन आणि हारजीत सिंग गिल याला सुद्धा ठाणे गुन्हे शाखेने अटक केली आहे.

अटक केलेल्यापैकी मनोज जैन हा या आधी अनेकदा विदेशात गेल्याचे उघड झाले आहे. या रॅकेटमध्ये आंतरराष्ट्रीय ड्रग माफिया विकी गोस्वामी ही असल्याचं तपासात उघड झालं आहे. एवढ्या मोठ्या प्रकार उघड झाल्यावर अमेरिकेतील पोलीस ही ठाणे पोलिसांना भेटून माहिती घेत आहेत. मनोज जैनची माहिती या आधीच अमेरिकन पोलिसांकडे होती. या प्रकरणात आतापर्यंत 8 आरोपींना ठाणे गुन्हे शाखेने अटक केली आहे. आणि या पुढेही अनेकांना अटक होणार आहे. या तपासात ठाणे गुन्हे शाखा गुजरात पोलीस गुजरात एटीएस आणि अमेरिकन पोलीस हे वेगवेगळ्या पद्धतीने तपास करत आहेत.या ड्रग रॅकेटचे जाळंमहाराष्ट्रातून केनिया आणि इतर देशातही पसरल्याचे समोर आले आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा