‘विवाहपूर्वी लैगिंक संबंध हा गुन्हा नाही’

March 24, 2010 11:56 AM0 commentsViews: 305

24 मार्चलिव्ह इन रिलेशनशीप अर्थात विवाहपूर्वी लैगिंक संबंध हा गुन्हा नाही, असा निर्णय सुप्रीम कोर्टाने दिला आहे. दोन प्रौढ व्यक्ती स्वेच्छेने जर एकत्र राहण्याचा निर्णय घेत असतील तर तो गुन्हा कसा काय होऊ शकतो? असा सवालही कोर्टाने उपस्थित केला आहे. दाक्षिणात्य अभिनेत्री खुशबू हिने दाखल केलेल्या याचिकेवरील सुनावणीदरम्यान कोर्टाने हे मत व्यक्त केले आहे. 2005 मध्ये खुशबू हिने आपण लग्नाआधी लैंगिक संबंध ठेवल्याचे एका मुलाखतीत मान्य केले होते. यामुळे खुशबूविरूद्ध 22 फौजदारी गुन्हे दाखल होते. यावरील सुनावणीदरम्यान कोर्टाने हा निर्णय दिला आहे. 2008 मध्ये मद्रास हायकोर्टाने याचिका फेटाळल्यानंतर खुशबूने सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती.

close