तुकाराम मुंढेंसह 73 अधिकार्‍यांच्या बदल्या, मंत्र्यांचे सचिवही बदलले

April 28, 2016 1:26 PM0 commentsViews:

28 एप्रिल : राज्यातील वरीष्ठ आयएएस अधिकार्‍यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. मुख्यमंत्र्यांचे सचिव प्रवीण दराडे यांच्यासह सुमारे 73अधिकार्‍यांची बदली करण्यात आली आहे. स्थानिक राजकारणाच्या दबावाने ठाणे जिल्हाधिकारी अश्विनी जोशी आणि सोलापूरचे जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांची बदली करण्यात आली आहे.badlaya33

प्रवीण दराडे यांचीही मुख्यमंत्री कार्यालयातून बदली करण्यात आली असून महत्वाच्या एमएमआरडीए विभागात पुनर्वसन करण्यात आलीये. मंत्री आणि सचिव यांच्या वादामुळे सचिवांची खाती बदलण्यात आलीय.

गिरीश बापट रामदास कदम, सुधीर मुनगंटीवार, राजकुमार बडोले यांच्याही सचिवांची बदली करण्यात आली आहे. कडक शिस्तीचे मालिनी शंकर आणि भगवान सहाय हे एकनाथ खडसे यांच्या विभागाचा कारभार पाहणार, अर्थ विभागाची जबाबदारी प्रथमच महिला अधिकार्‍यांच्याकडे सोपवण्यात आलीये. सीताराम कुंटे यांची उच्च तंत्र शिक्षण विभागात बदली करण्यात आलीये.

विशेष म्हणजे, या बदल्या करताना मुख्यमंत्र्यांनी आर्थिक दृष्ट्या अत्यंत संवेदनशील समजल्या जाणार्‍या पदावर नॉन करप्ट अधिकार्‍यांना नेमण्याचा धाडस दाखवलंय. तर चौकशीच्या फेर्‍यात अडकलेल्या अधिकार्‍यांना साइड पोस्टिंग दिल्याचं दिसतंय. सार्वजनिक बांधकाम, जलसंपदा, सामान्य प्रशासन, कृषी, जलसंधारण आणि मदत आणि पुनर्वसन विभागात कडक शिस्तीच्या अधिकार्‍यांची नेमणूक केली आहे.

तर आगामी 27 जिल्हा परिषद निवडणूक पाहता सर्व या जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी म्हणून तरुण आयएएस अधिकार्‍यांच्या नियुक्त्या केल्या आहेत. मुख्यामंत्र्यांनी प्रशासन आणि राजकारणावर कमांड मिळवल्याचे संकेत दिलेत.

प्रमुख बदल्या

मुंबई जिल्हाधिकारी म्हणून अश्विनी जोशी
उपनगर जिल्हाधिकारी दिपेंद्र कुशवाह
नवी मुंबई आयुक्त तुकाराम मुंढे
सेल टॅक्स शैला राय
सार्वजनिक बांधकाम सचिव आशिष कुमार
जलसंधारण – एकनाथ डवले
मदत पुनर्वसन सचिव मालिनी शंकर
जलसंपदा – सचिव आय एस चहल


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा