हाजी अली दर्ग्यात मजारपर्यंत जाणार नाही -तृप्ती देसाई

April 28, 2016 2:04 PM0 commentsViews:

28 एप्रिल : भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्ष तृप्ती देसाई आज हाजी अली दर्ग्यात प्रवेश करण्याचा निर्धार केलाय. यासाठी तृप्ती देसाई पुण्यातून निघाल्या आहेत. अनेक मुस्लिम संघटना आपल्याबरोबर असल्याचं सांगत दर्ग्यात मजारपर्यंत जाणार नसून जिथपर्यंत महिला आणि पुरुषांना जाऊ दिलं जातंय तिथपर्यंतच जाऊन दुवा मागणार असल्याचं देसाईंनी स्पष्ट केलं.

desai_durga333ज्यांना विरोध करायचा त्यांनी लोकशाही मार्गाने विरोध करावा ,कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न तयार होणार नाही याची काळजी घ्यावी असंही देसाईंनी म्हटलंय. तसंच राष्ट्रीय स्वयंसेवक संघात महिलांना संधी द्यावी अशी मागणी तृप्ती देसाईंनी केली. या विषयीचं पत्र सरसंघचालक मोहन भागवत यांना दिलं असून त्यांना भेटून चर्चा करणार असल्याचं तृप्ती देसाई म्हणाल्या. दरम्यान, तृप्ती देसाई यांच्या इशारानंतर हाजी अली परिसरात सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे. मोठ्या प्रमाणात हाजी अली दर्ग्यात परिसरात पोलीस तैनात करण्यात आले आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा