सातार्‍यात बांधकाम सुरू असताना पूल कोसळला

April 28, 2016 12:08 PM0 commentsViews:

सातारा – 28 एप्रिल : पुणे बंगळुरू महामार्गावरील सातारा जिल्ह्याच्या हद्दीतील भुईंज येथे पुल कोसळल्याने मोठी खळबळ उडाली. या दुर्घटनेत 3 कामगार जखमी झाले असून त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे.satara_brdg

महामार्गावरील सातारा जिल्ह्याच्या हद्दीतील भुईंज येथील नविन उड्डान पुलाचे बांधकाम सुरू होते. काल या पुलावर स्लॅब टाकण्याचे काम सुरू होते. जवळपास काम संपूर्ण झालेलं असताना अचानक हा पूल खाली कोसळला. पुलाखाली कोणी नव्हतं पण पुलावर काम करणारे कामगार पुलासकटच खाली आले.

या कामगारांपैकी तीन कामगार जखमी झाले. जखमी कामगारांना सातारा जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हा पुल कोसळल्यावर मोठ्या प्रमाणात आवाज झाला त्यामुळे या परिसरात भितीचे वातावरण तयार झालंय. हा पूल नेमका कोणत्या कारणाने ढासळला हे मात्र अजून स्पष्ट झालं नाहीये. मात्र, महामार्गावरची काम लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या प्रयत्नात ही घटना घडली असावी असं स्थानिकांचं म्हणणंय.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा