शशांक मनोहरांचा राजीनामा ? ; शरद पवार, अजय शिर्के बीसीसीआयच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत

April 28, 2016 2:23 PM1 commentViews:

shashank manohar bcci28 एप्रिल : बीसीसीआयचे अध्यक्ष शशांक मनोहर यांच्यासमोर एक यक्षप्रश्न उभा राहिला आहे. बीसीसीआयचं अध्यक्षपद राखायचं की आयसीसीचं चेअरमनपद? या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी मनोहर यांच्याकडे केवळ दीड महिन्याचा अवधी आहे. मात्र, मनोहर यांनी बीसीसीआयच्या अध्यक्षपदाची तिलांजली दिल्यास राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि अजय शिर्के शर्यतीत असण्याची चिन्हं आहेत.

मनोहर हे सध्या बीसीसीआयचे अध्यक्ष आणि आयसीसीचे चेअरमन अशी दुहेरी भूमिका बजावत आहेत. आयसीसीच्या नव्या चेअरमनची निवड ही मेच्या अखेरच्या आठवड्यात होणार आहे आणि आयसीसीच्या नव्या नियमांनुसार चेअरमन पदावरच्या व्यक्तीला राष्ट्रीय किंवा राज्य क्रिकेट असोसिएशनमध्ये दुसरं पद भूषवता येणार नाही. त्यामुळे आयसीसीच्या चेअरमनदावर पुन्हा निवडून यायचं, तर शशांक मनोहर यांना बीसीसीआयच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागणार आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


  • Sanjay Kulkarni

    काय फरक पडणार आहे? सगळे ’आपण सारे भाऊ भाऊ’ तर आहेत