भरारी इस्त्रोची, आता भारताची हक्काची जीपीएस यंत्रणा

April 28, 2016 3:35 PM0 commentsViews:

28 एप्रिल : भारतीय संशोधन संस्था अर्थात इस्त्रोच्या शिरपेचात आज आणखी एक मानाचा तुरा रोवला गेलाय. आता भारताची स्वतंत्र्य जीपीएस यंत्रणा असणार आहे. श्रीहरी कोटा येथून IRNSS 1G उपग्रहाचं यशस्वी प्रक्षेपण करण्यात आलंय.

isro34आज IRNSS 1G उपग्रहाचं श्रीहरी कोटामधल्या सतीश धवन उपग्रह केंद्रातून यशस्वी प्रक्षेपण करण्यात आलं. पीएसएलव्ही सी 33 या उपग्रह वाहक यानातून प्रक्षेपण झालं. दिशादर्शक मालिकेतला हा सातवा आणि शेवटचा उपग्रह आहे. अशी क्षमता असलेला भारत हा जगातला 5 वा देश ठरलाय. अवकाश संशोधनात यामुळे भारताची मान उंचावली असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या यशाबद्दल इस्त्रोच्या शास्त्रज्ञांचे अभिनंदन केलंय. या उपग्रहाचा दळणवळण क्षेत्र, मच्छिमार आणि लष्कराला फायदा होणार आहे. या यंत्रणेला नाविक असं नाव देणार असल्याचं पंतप्रधान म्हणालेत. उपग्रहाचा सार्क देशांनाही फायदा होणार असल्याचंही पंतप्रधानांनी सांगितलं.

काय आहे IRNSS 1G हा उपग्रह ?

- भारताच्या दिशादर्शक मालिकेतला शेवटचा सातवा उपग्रह
- या उपग्रहाच्या प्रक्षेपणामुळे भारताची स्वत:ची जीपीएस यंत्रणा
- अशी क्षमता असलेल्या पाच देशांमध्ये भारताचा समावेश
- एखाद्या ठिकाणाची स्थिती सांगणं, दिशा दाखवणं आणि एखाद्या भूभागाचा नकाशा तयार करणं ही मुख्य कामं
- दळणवळण, जलवाहतूक आणि लष्कराला फायदा होणार
- भारत ही सेवा शेजारच्या देशांनाही देवू शकतो
- उपग्रहासाठी 600 कोटींचा खर्च
- पृथ्वीपासून 36 हजार किमीवर उपग्रह
- गेली 17 वर्ष शास्त्रज्ज्ञ यावर काम करत होते
-


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा