चंद्रपूरमध्ये जलस्वराज्य योजनेत भ्रष्टाचार

March 24, 2010 12:00 PM0 commentsViews: 5

24 मार्चचंद्रपूर जिल्ह्यात जिवती भागात सरकारच्या जलस्वराज्य योजनेत मोठया प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे. जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त भागासाठी जलस्वराज योजनेतून 39 कोटी 87 लाखांच्या कामांचे वाटप करण्यात आले. पण ठेकेदार आणि समित्यांनी कामाचे पैसे उचलून काम अर्ध्यावरच सोडले आणि गावातून काढता पाय घेतला. इतके सगळे झाल्यावर आता अधिकार्‍यांना अफरातफर झाल्याचे समजले. जिल्ह्यातील रायपूर गावात 22 लाख, येलापूरमध्ये 23 लाख, तर दवलगुडामध्ये 15 लाख रुपये खर्च झाले आहेत. पण गावकर्‍यांना एक थेंबही पाणी मिळालेले नाही.

close