…अन्यथा तृप्ती देसाईंना धक्के मारून बाहेर हाकलून देऊ -अबू आझमी

April 28, 2016 5:21 PM0 commentsViews:

28 एप्रिल : तृप्ती देसाई या प्रसिद्धीसाठी हा सगळा खटाटोप करत आहे. त्यांनी जर दर्ग्यात जाण्याचा प्रयत्न केला तर धक्के मारून बाहेर काढू असा इशारा सपाचे आमदार अबू आझमी यांनी दिलीय.abu azami34

भूमाता ब्रिगेडच्या नेत्या तृप्ती देसाई आज मुंबईतील हाजी अली दर्ग्यात महिलांना प्रवेश मिळावा यासाठी आंदोलन करणार आहे. त्यांच्या या आंदोलनाला स्थानिक मुस्लिम नेत्यांनी विरोध दर्शवलाय. एमआयएमने तर तृप्ती देसाईंना काळं फासणार असा इशारा दिलाय. आता सपाचे आमदार अबू आझमी यांनीही या प्रकरणात उडी घेतलीये. तृप्ती देसाई या प्रसिद्धीसाठी हा ड्रामा करत आहे. दर्ग्यात महिलाने जाणे न जाणे हा आमच्या समाजाचा प्रश्न आहे. त्यात तृप्ती देसाईंनी ढवळाढवळ करू नये. मी, माझ्या मुस्लिम महिला कार्यकर्त्यांना आदेश दिले असून तृप्ती देसाईंनी जर दर्ग्यात मजार (कब्र) पर्यंत जाण्याचा प्रयत्न केला तर धक्के मारून हाक लून द्या असा इशारा अबू आझमी यांनी दिलाय.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा