विरारच्या महालक्ष्मी यात्रेत चिमुरडेच खेळताय जुगार !

April 28, 2016 6:28 PM0 commentsViews:

28 एप्रिल : ज्या वयात वह्या-पुस्तकं हातात हवी त्या वयात लहान मुलं जुगार अड्डाच चालवत असल्याची धक्कादायक बाब विरार-डहाणूमध्ये घडलीये. महालक्ष्मीच्या जत्रेत 10 ते 12 वर्षांची मुलं राजरोसपणे जुगार खेळत आणि अड्डे चालवत आहे.
virar jugar
विरार-डहाणू या परिसरात सध्या महालक्ष्मी देवीची जत्रा सुरू आहे. मोठ्या प्रमाणात या जत्रेसाठी भाविक येतात. पण याचं जत्रेल 10-12 वर्षांची मुलं जुगार खेळतांना दिसतायत. तर याच वयाची काही मुलं आणि मुली जुगार चालवत असल्याची धक्कादायक बाब समोर आलीये. महत्त्वाचं म्हणजे जत्रेत राजरोसपणे हा जुगार सुरू आहे. शाळेत जाण्याच्या वयाची ही मुलं जुगारातून पैसे कमावतायत. पण कुणीही त्यांना अडवतांना दिसत नाहीये. पोलिसांच्या नजरेसमोर हा प्रकार सुरू आहे. पण या मुलांना अडवायला. जुगार थांबवायला पोलीस काहीही करत नाहीये. त्याबाबत पोलिसांशी बोलण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी कुठलीही प्रतिक्रीया द्यायला नकार दिलाय. एकप्रकारे पोलिसांच्या वरदहस्तानेच हा प्रकार सुरू असल्याची चर्चा आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा