राणेंना अजून जमालगोटा दिलेला नाही – उद्धव ठाकरे

October 12, 2008 2:25 PM0 commentsViews: 10

12 ऑक्टोबर, कोल्हापूर'ज्यांनी मरण दिलं, त्यांना जीवदान देवू नका, असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी आज शेतकर्‍यांना केलं. ते कोल्हापूरात ऊस परिषदेत बोलत होते. 'जो कारखाना ऊसाला जादा भाव देईल, त्यांच्याकडे ऊस पाठवा, असा सल्लाही त्यांनी ऊस उत्पादक शेतकर्‍यांना दिला. शिवसेना आणि शेतकरी संघटना यापुढे एकत्र येवून ताकदीनं शेतकर्‍यांच्या प्रश्नासाठी झटणार असल्याचंही उद्धव ठाकरे यांनी जाहीर केलं.दसरा मेळाव्याला शिवसेनापमुख आले नसते तर बाकीच्‌्या कावळ्यांनी काव काव केलं असतं, असा टोलाही त्यांनी लगावला. शेतकर्‍यांच्या विरोधी धोरण राबवण्यार्‍यांची जोड्याजवळ ठेवण्याची किमंत नाही, असंही ते म्हणाले. नारायण राणे यांचा समाचार घेतांना राणे यांना अजून जमालगोटा दिलेला नाही, असं त्यांनी म्हटलं.

close