गावकर्‍यांची दुष्काळावर मात, दिवसातून दोनदा होतो पाणीपुरवठा

April 28, 2016 8:31 PM0 commentsViews:

 
राजेंद्र हुंजे, दौंडवाडी, बीड -28 एप्रिल : बीड जिल्ह्यातलं दौंडवाडी गाव पाण्याच्या दुर्भिक्ष्यातून बाहेर पडून पाण्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झालंय. जलस्वराज्य योजनेच्या माध्यमातून गावानं ही स्वयंपूर्णता आणली आहे. एवढंच नाहीतर मोबाईलद्वारे गावाचा पाणी पुरवठा नियंत्रित केलेला आहे.beed_dondwadi

अंबाजोगाई आणि परळी तालुक्याच्या सीमेवर वसलेलं हे आहे दौंडवाडी…आजूबाजूला ओसाड माळरान आणि रखरखीत उन्हात बोडके दिसणारे डोंगर…अशाही परिस्थितीत गावानं आजूबाजूच्या परिसरात 25 तलाव बांधलेत. त्यामुळे सध्या तलावात 10 ते 20 टक्के पाणी शिल्लक आहे. याच पाण्याचं योग्य नियोजन करून गावाला दररोज सकाळ-संध्याकाळ एक तास पाणीपुरवठा केला जातो.

दौंडवाडीच्या या पाण्यानं भर उन्हात पक्षांचीही तहान भागते. तहानलेले पक्षी असे पाईपमधून पडणा-या पाण्यात चोच घालून पोटभर पाणी पितात. गावाचा सगळा पाणी पुरवठा मोबाईल वरुन नियंत्रित केला जातो. गावातल्या एका माणसाकडे हे काम सोपवण्यात आलंय.

गावाच्या बाजूला असलेल्या तलावातलं पाणी शेतीसाठी वापरायचं नाही असा निर्धार गावकर्‍यांनी केला आहे. त्यामुळे गावाला पिण्याचं पाणी दुष्काळातही व्यवस्थित मिळतं.

‘गाव करील ते राव काय करील’ ही म्हण इथल्या गावकर्‍यांनी ख-या अर्थानं सार्थकी ठरवलीय.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा