सी-लिंकच्या दुसर्‍या लेनचे उद् घाटन

March 24, 2010 12:54 PM0 commentsViews: 5

24 मार्चमुंबईचा नवा लँडमार्क ठरलेल्या सी-लिंकच्या दुसर्‍या लेनचे आज थाटामाटात उद्घाटन झाले. या उद्घाटनाला अमिताभ बच्चन यांची प्रमुख उपस्थिती होती. मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्यासह अनेक नेतेही यावेळी उपस्थित होते. गेल्यावर्षी 30 जूनला काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी सी-लिंकच्या 4 लेनचे उद् घाटन केले होते. राहिलेल्या 4 लेनचे उद्घाटन आज झाले. आता आठही लेन वाहतुकीसाठी खुल्या झाल्याने वाहतूक अधिक जलद होणार आहे. या नवीन चार लेनवरुन वरळीहून-बांद्र्याकडे वाहतूक सुरू होईल.तर यापूर्वीच्या चार लेनवरून बांद्र्याहून-वरळीकडे वाहतूक होत आहे. या सी-लिंकसाठी 1600 कोटी रुपये खर्च आला आहे.

close