मेडिकल प्रवेशासाठी आता ‘नीट’ लागू !

April 28, 2016 9:29 PM0 commentsViews:

neet_exam28 एप्रिल : एमबीबीएस आणि बीडीएस प्रवेशांसाठी केंद्रीय पातळीवर आता राष्ट्रीय पात्रता चाचणी (नीट) घेण्यात यावी असा महत्त्वपूर्ण निर्णय सुप्रीम कोर्टाने दिलाय. ‘नीट’ यंदापासून करण्यात येणार असून पहिल्या टप्प्यात 1 मे रोजी आणि 24 जुलैला दुसर्‍या टप्पात परीक्षा घेण्यात येणार आहे. या दोन्ही परीक्षांचा निकाल 17 ऑगस्ट रोजी जाहीर होणार आहे.

2013 मध्ये नीट परीक्षा सक्ती रद्द करण्याचा आदेश सुप्रीम कोर्टाने मागे घेतला होता. त्यामुळे नीट परीक्षा राष्ट्रीय पातळीवर होणार अशी शक्यता होती. तामिळनाडू, आंध्र प्रदेश, तेलंगणा, उत्तर प्रदेश आणि कर्नाटकमध्ये काही संस्थांना नीट परीक्षेला विरोध दर्शवला होता. याविरोधात याचिकाही दाखल करण्यात आली होती. पण कोर्टानी ती फेटाळून लावली. त्यामुळे मेडिकलला प्रवेश घ्यायचा असेल तर ‘नीट’च्या मार्ग पार करावा लागणार आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा