आरोप करणार्‍यांनी स्वतःचं तोंड आरशात पाहावं -पंकजा मुंडे

April 29, 2016 12:47 PM0 commentsViews:

pankaja munde29 एप्रिल : माझ्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करणार्‍याविरोधात जेलमध्ये घालीन एवढे पुरावे आहेत. आरोप करणार्‍यांनी स्वतःचं तोंड आरशात पाहावं, मी तोंड उघडलं तर त्यांना पळताभूई थोडी होईल असा इशारा महिला आणि बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांनी दिलाय.
नगरच्या पाथर्डीमध्ये संत वामनमहाराज हरिनाम सप्ताह सोहळ्यात त्या बोलत होत्या.

अहमदनगरला पाथर्डीत संत वामनभाऊ महाराज यांच्या हरीनाम सप्ताह सोहळ्यात त्या बोलत होत्या. यावेळी पंकजा मुंडे यांनी अप्रत्यक्षरित्या धनंजय मुंडे आणि विरोधकांवरही हल्ला केला. दोन वर्षपासून मी मंत्री असून शत्रूनी आरोप केले. पण मी सकारात्मक विचार करत असल्याचं त्यांनी म्हटलंय. माझ्यात बदल्याची प्रवृत्ती नसल्याचंही त्यांनी म्हटलंय. रक्ताच्या नात्यापेक्षाही प्रेमाचं नातं मोठं असल्याचंही त्यांनी म्हटलंय. यावेळी त्यांनी पौराणिक कथांचा दाखला देत अप्रत्यक्षरित्या धनंजय मुंडे यांच्यावर जाहीर टीका केली. दुर्योधना सारखा पोटशुळ कोणत्याही पिढीला होत असल्याचा आरोपही त्यांनी केलाय. स्वःता प्रगती न करता दुसर्‍याची अधोगती करण्याचं काम सुरू असल्याचंही पंकजा मुंडे यांनी म्हटलंय.

जीवनात एवढं दुःख भोगून मलाही वैराग्य आलंय. अती झालं तर मी सुध्दा वैराग्य घेऊन बसू शकते कुठं तरी अशी उधिग्नताही त्यांनी व्यक्त केली. मी कोणाच्याही पैशांची मींदी असेल तर व्यासपीठावर येणार नसल्याचंही त्यांनी म्हटलंय.

त्याचबरोबर मला सगळ्याचं पातळीवर विरोध असून अभिमन्यु सारखं घेरलं असल्याची खंतही त्यांनी व्यक्त केलीय. मुंडे साहेबांनंतर समाजानं क्षेत्र दिलं. त्यामुळं दोन्ही गडानं कन्या म्हणून जपावं, असं आवाहनही त्यांनी केलं.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा