पाण्यासाठी महिलांचा रास्तारोको

March 24, 2010 1:02 PM0 commentsViews: 3

24 मोर्चा कोल्हापूर शहरात आझाद चौक इथे पाण्याच्या मागणीसाठी महिलांनी रास्तारोको केला. गेल्या काही दिवसांपासून शहरात अपुरा आणि अनियमीत पाणीपुरवठा होत आहे. आज कंटाळून संतप्त महिला भांडी घेऊन रस्त्यावर उतरल्या. त्यामुळे उमा टॉकीज ते बिंदू चौक मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. नगरसेवक आणि प्रशासकीय अधिकार्‍यांच्या मध्यस्तीनंतर हा रास्तारोको मागे घेण्यात आला.

close