2019च्या निवडणुकांसाठी नितीश कुमार पंतप्रधानपदाचे योग्य उमेदवार -शरद पवार

April 29, 2016 4:35 PM0 commentsViews:

29 एप्रिल : पंतप्रधानपदासाठी नितीश कुमार हे योग्य उमेदवार आहेत असं मत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केलंय. 2019 च्या लोकसभा निवडणुकीच्यावेळी नितीश कुमार हे पंतप्रधान पदाचे उमेदवार असतील असे संकेतही पवारांनी दिले आहे.pawar_on_nitesh

पवारांच्या या वक्तव्यावरून नव्या राजकीय चर्चेला सुरूवात झाली असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात नवी आघाडी उघडण्याचे संकेत शरद पवारांनी दिलेत असे मानलं जातंय. बिहारमध्ये झालेल्या निवडणुकीत नितीश कुमार यांनी घवघवीत यश मिळवून दिलं होतं. त्यांच्या या विजयामुळे भाजप आणि काँग्रेसला चांगलाच धक्का बसला होता. बिहारचा विजय हा नितीशकुमार यांच्यामुळे शक्य झाला. काही लोकं आहे जे असं काम करू शकता. पण, नितीश कुमार यांच्यामध्ये तेवढं सामर्थ्य आहे अशी स्तुतीही पवारांनी केली.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा