दूध भेसळ करणार्‍या टोळीचा म्होरक्या अटकेत

March 24, 2010 1:09 PM0 commentsViews: 144

24 मार्चमुंबईतील दहिसर भागातील पंचशीलनगर झोपडपट्टीमध्ये दूध भेसळ करणार्‍या टोळीच्या म्होरक्याला पोलिसांनी अटक केली आहे. शंकर असे या व्यक्तीचे नाव आहे. मंगळवारी बोरिवली भागातून शंकरला अटक करण्यात आली. शनिवारी या परिसरात अन्न आणि औषध प्रशासन विभागाने धाड टाकून दुधात भेसळ करणार्‍या टोळीला अटक केली होती. यात 9 जणांना अटक करण्यात आली. यांच्याकडून जवळपास 1 हजार लीटर भेसळयुक्त दुध जप्त करण्यात आले. अमूल, गोकुळ, महानंदा यांसारख्या मोठ्या कंपन्यांच्या दुधामध्ये ही भेसळ केली जात होती. त्याचबरोबर भेसळ करणार्‍या लोकांकडून इतर दूध कंपन्यांच्या दुधाच्या पिशव्याही जप्त करण्यात आल्या. एका लीटरच्या पिशवीतून जवळपास 100 मिलीलीटर दूध काढले जात होते. त्याच्या बदल्यात त्या पिशवीमध्ये पाणी भरले जात होते. दहिसरसोबतच पोईसर, शिवाजीनगर आणि बोरिवली वेस्टमध्येही एफडीआयने ही धडक कारवाई केली आहे.

close