महिलांची फसवणूक करणार्‍या दोघांना अटक

March 24, 2010 1:17 PM0 commentsViews: 1

24 मार्चबचत गटांना काम देण्याचे आमिष दाखवून 100 पेक्षा अधिक महिलांची फसवणूक करणार्‍या दोघांना औरंगाबादच्या क्रांती चौक पोलिसांनी अटक केली आहे.प्रकाश गुंजकर आणि त्याचा मुलगा पराग गुंजकर यांनी दिल्लीच्या अलास्का ग्रुपच्या माध्यमातून शहरातील भीमनगर, आसेफिया कॉलनी भागात 300 ते 500 रुपये कमवा अशी पत्रके वाटली. महिलांकडून प्रत्येकी 500 रुपये घेऊन त्यांना प्लास्टिकच्या मण्यांची माळ पुरवण्याची ऑर्डर दिली गेली. एक किलो मण्यांची माळ पुरवली तर 75 रुपये देण्याचे आमिष या ग्रुपने दिले. मात्र पैसै देण्याच्या वेळी या सर्वांनी काढता पाय घेतला. याप्रकरणी पोलिसांना दोघांना अटक केली.

close