उद्या महाराष्ट्रदिनी विदर्भात काळा दिवस पाळणार -अणे

April 30, 2016 2:21 PM0 commentsViews:

aney bannerनागपूर – 30 एप्रिल : उद्या महाराष्ट्रदिनाला काळा दिवस पाळला जाणार असा चिथावणीखोर इशारा माजी महाधिवक्ता श्रीहरी अणे यांनी दिलाय. स्वतंत्र विदर्भाच्या आंदोलनाचा विरोध करणार्‍या शिवसेनेची भाषा बदलल्याचा आनंद आहे, विचारांचा लढाई विचारांनीच लढायला पाहिजे हे शिवसेनेच्या लक्षात आली असा टोलाही अणे यांनी लगावलाय.

शिवसेनेची विरोध करण्याची एक प्रवृत्ती आहे.पण, फक्त शिवसेनाच नाही तर मनसे आणि स्वाभिमानी संघटनेचे नेत नितेश राणे यांच्यासोबत कधीही चर्चा करण्यासाठी तयार असल्याचं ते अणे म्हणाले. 1 मे महाराष्ट्र दिनी संपूर्ण विदर्भात काळा दिवस पाळून स्वतंत्र विदर्भाचा झेंडा फडकावला जाणार आहे. या आधीही अणे यांनी वेगळ्या विदर्भासाठी महाराष्ट्राचा केक कटिंग केला होता.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा