मुंबईच्या कामाठीपुर्‍यात इमारत कोसळली, 5 ठार

April 30, 2016 4:34 PM0 commentsViews:

kamathipura33मुंबई -30 एप्रिल: ग्रँट रोड परिसरातील कामाठीपुरा येथे तीन मजली इमारत कोसळलीये. चौदाव्या गल्लीत ही दुर्घटना घडली आहे. दुरुस्तीचं काम सुरू असताना ही इमारत कोसळली. या दुर्घटनेत 5 जणांचा मृत्यू झालाय.

कामाठीपुर्‍यातील 14 व्या गल्लीत ही तीन मजल्यांची इमारत कोसळली. अग्निशमनदलाच्या पाच गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.  10 जणांना ढिगार्‍यातून बाहेर काढण्यात यश आलं. जखमींना उपचारासाठी जेजे रुग्णालयात पाठवण्यात आलंय. या दुर्घटनेत 5 जणांचा मृत्यू झालाय.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा