‘याडं’ लागलं, सिनेमागृहं ‘झिंग झिंग झिंगाट’ने दणाणली

April 30, 2016 5:31 PM0 commentsViews:

30 एप्रिल : झिंग…झिंग..झिंगाट…वर ठेका धरायला भाग पाडत ‘सैराट’ने प्रेक्षकांना अक्षरश: ‘याडं’ लावलंय. कारण, इतिहासात आजवर कोणत्याही सिनेमाला असा अभुतपूर्व प्रतिसाद मिळाला नाही तसा प्रतिसाद सैराटला मिळालाय. सांगली, सोलापूर, पुणेसह सुरतपर्यंत सिनेमागृहात प्रेक्षकांनी चक्क स्क्रिनसमोर ‘झिंग झिंग झिंगाट’वर सैराट डान्स केलाय. खास करून सोलापूरकरांनी आपल्या स्टाईलमध्ये सैराटचं स्वागत केलंय. ‘आर्ची’ अर्थात रिंकू राजगुरूही सोलापूरची आहे. त्यामुळे सोलापूरकरांनी सिनेमागृहं दणाणून सोडलीये. विशेष म्हणजे, पहिल्याच दिवशी आजपर्यंतच्या सर्वच सिनेमाचे रेकॉर्ड ब्रेक केलंय. नागराज मंजुळे यांचं सर्वच स्तरातून कौतुक होतं आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा