आघाडीतील वाद सी लिंकवर

March 24, 2010 2:09 PM0 commentsViews: 5

अमेय तिरोडकर, मुंबई24 मार्च आज राजीव गांधी सी- लिंकचा 4 लेनचा दुसरा फेज चालू झाला. ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री अशोक चव्हाणांनी याचे उद् घाटन केले. यावेळी काँग्रेस-राष्ट्रवादीमधील गेल्या अनेक दिवसांचा वाद मुख्यमंत्री आणि उपमुख्यंत्र्यांनी एकमेकांना मारलेल्या कोपरखळ्यांतून पुढे आला. माणसं दुरावतायत… ठिकाणं जोडणार्‍या पुलांचं कॉन्ट्रॅक्ट कुणाकडे द्यायचं यावरून… सी – लिंकवरील उद्घाटनाच्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या बोलण्यातून ही खदखद बाहेर पडलीच.सी- लिंकचे पुढचे दोन्ही टप्पे राष्ट्रवादीकडे असलेल्या एमएसआरडीसीकडे गेलेत. पण ट्रान्सहार्बर लिंकचा प्रकल्प कुणाकडे जाणार? काँग्रेसकडे असणार्‍या एमएमआरडीएचा त्याच्यावर डोळा आहे. पण अशा पुलांमधून सत्ताधार्‍यांना आपल्या गाठीला मोठमोठे उद्योगपती जोडता येतात. सत्तेतील भागीदारांनही एकमेकांना जोडून राहिले पाहिजे. सूर कडवट झालेल्या भुजबळांना मुख्यमंत्र्यांनी हेच गोड सुरात सांगितले.अमिताभवरून मानपानया उद् घाटनानंतर आता अभिनेता अमिताभ बच्चन यांच्या उपस्थितीवरून काँग्रेस आणि राष्ट्रवादीत मानापमान नाट्य रंगले आहे. अमिताभ यांच्या उपस्थितीवरून खुद्द मुख्यमंत्री अशोक चव्हाणच नाराज आहेत. या कार्यक्रमाला अमिताभ येणार हे मला कार्यक्रमाच्या ठिकाणीवर गेल्यावरच कळले, असे मुख्यमंत्री 'आयबीएन-लोकमत'शी बोलताना म्हणाले. अमिताभ हे दुसर्‍या राज्याचे ब्रँड ऍम्बॅसिडर आहेत. शिवाय त्यांनी गुजरात आणि मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्याशीही अलिकडेच जवळीक दाखवली आहे. त्यामुळे मुंबईतील कार्यकर्ते त्यांच्या उपस्थितीवरून नाराज आहेत, असेही मुख्यमंत्री म्हणाले.मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष कृपाशंकरसिंग यांनीही अशाच भावना व्यक्त केल्या आहेत. या कार्यक्रमाला अमिताभ बच्चन यांना बोलावण्याचे औचित्य काय? असा सवाल त्यांनी केला आहे. शिवाय निमंत्रण पत्रिकेवरही बच्चन यांचे नाव नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. ये पूल ना केवल शहरों को जोडता है, बल्कि ये प्यार, मोहब्बत और भाईचारे का अद्भुत प्रतीक है, शहेनशहा अमिताभला या सी लिंकवर आल्यावर असे वाटले. पण अशाच पुलांवरून काँग्रेस-राष्ट्रवादी मनाने मात्र दूर चालले आहेत, हेही यानिमित्ताने स्पष्ट झाले. खुलासा करण्याचे सोनियांचे आदेशयाबद्दल काही काँग्रेस नेत्यांनी सोनिया गांधी यांच्याकडे तक्रार केली आहे. त्यावर आता सोनियांनी मुख्यमंत्र्यांकडे स्पष्टीकरण मागितले आहे.

close