अनुदान रखडल्यामुळे शेतकर्‍यांनी पेटवली मोसंबीची बाग

April 30, 2016 6:06 PM0 commentsViews:

औरंगाबाद – 30 एप्रिल : आधीच दुष्काळ त्यात पीक-पाणी नाही आणि त्यात सरकारनं दाखवलेली अनास्था यामुळे शेतकरी राजा चांगलाच संतापलाय. पैठण इथल्या अनेक बागायतदार शेतकर्‍यांचे अनुदान गेल्या अनेक दिवसांपासून रखडलंय. ठिबक अनुदान, शेततळ्यांची अनुदानं, मोसंबीचं अनुदान गेल्या 4 वर्षांपासून शेतकर्‍यांच्या हातात पडलेलं नाहीये. त्यामुळे शेतकरी संतापले आहेत. घारधोंड गावातील शेतकर्‍यानं आपली मोसंबीची बागचं पेटवून देऊन सरकारी कारभाराचा निषेध केलाय.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा