मराठवाड्यातील उद्योग-धंदे मोजताय शेवटच्या घटका !

April 30, 2016 8:40 PM0 commentsViews:

सिद्धार्थ गोदाम,औरंगाबाद -30 एप्रिल : मराठवाडा सततच्या दुष्काळामुळं 50 वर्षे मागे फेकला गेलाय. मराठवाड्याच्या रोजगाराचा शेवटचा पर्याय असलेल्या उद्योगांवरही टांगती तलवार आहे. पाणी नसल्यानं मराठवाड्याची आर्थिक अवस्था उध्द्‌वस्त होण्याच्या मार्गावर आहे. आधीच मराठवाड्याकडे मोठ्या उद्योगांनी पाठ फिरवलीय. आता पायभूत सुविधाच अपुर्‍या पडत असल्यानं तेच उद्योग मराठवाड्यातून निघाले तर वाईट अवस्था निर्माण होण्याची शक्यता आहे.abad_water_indestry

नांदेड जिल्ह्यातील कंधारचे शंकर नन्नुरे…लेथ मशिनवरचे कुशल कामगार आहेत..घरी चार एकर कोरडवाहू शेती आहे. शेतीत काही पिकत नाही म्हणून ते औरंगाबादेतील वाळूज औद्योगिक वसाहतीमध्ये रोजगार शोधत आले.त्यांना रोजगार मिळाला. मात्र, आता त्यांना आपला रोजगार उद्या राहतो की नाही अशी भीती वाटते आहे.कारण उद्योगांना होणार्‍या पाणी पुरवठयात कपात झाली आहे.

कोर्टाच्या आदेशानुसार मराठवाड्यातील मद्य उत्पादन करणार्‍या कंपण्यांचा 60 टक्के पाणी पुरवठा बंद कऱण्यात येणार आहे. इतर उद्योगांचाही 25 टक्के पाणी कपात होणार आहे. औरंगाबादेत असलेल्या मद्य कंपण्यांनी आपले काही युनिट आता बंद ठेवण्याचा निर्णय घेतलाय.त्यामुळे अनेक कामगारांना रोजगाराला मुकावं लागणार आहे.

औरंगाबाद, जालना जिल्ह्यात जवळपास साडेचार उद्योग आहेत आणि या उद्योगांच्या माध्यमातून साडे सहा लाख लोकांना रोजगार
मिळालाय.मात्र, पाण्याअभावी उद्योग चालवणं अवघड झाल्यानं अनेक युनिट बंद करण्यात आले आहे.

कोर्टाचा निर्णय योग्यच आहे. कारण, माणुस जिवंत राहिलातरच रोजगाराची गरज आहे. रोजगार वाढीसाठी उद्योग वाढवण्याचा प्रयत्न कऱणार्‍या सरकारनं पाण्याचे नियोजन केले तरच मराठवाड्यातील उद्योग टिकतील. नाहीतर मराठवाड्याच्या रोजगाराचा शेवटचा पर्याय असलेला उद्योग राहिला नाही तर अराजकता माजेल.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा