डुंगारपूर यांच्या पोर्ट्रेटचे सचिनच्या हस्ते अनावरण

March 24, 2010 2:32 PM0 commentsViews: 1

24 मार्च मुंबईच्या क्रिकेट क्लब ऑफ इंडियामध्ये आज बीसीसीआयचे माजी अध्यक्ष राजसिंग डुंगारपूर यांच्या पोर्ट्रेटचे अनावरण करण्यात आले. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याच्या हस्ते हा कार्यक्रम पार पडला. यावेळी सचिनने राजसिंग यांच्याबद्दलच्या काही आठवणींना उजाळा दिला. 1986मध्ये पहिल्या परदेशवारीसाठी राजसिंग यांनीच आपल्याला आर्थिक मदत केली होती, असे सचिनने यावेळी सांगितले. आज राजसिंग जरी आपल्यात नसले तरी त्यांचे अस्तित्व आजही जाणवते, अशा भावना सचिनने व्यक्त केल्या.

close