एक कोटींचा ‘पिझ्झा’ तरुणाला पडला महागात

May 1, 2016 11:33 AM0 commentsViews:

मुंबई – 01 मे : शाकाहारी पिझ्झाच्या ऐवजी मांसाहारी पिझ्झा खायला दिल्याचा बनाव रचून धर्मभ्रष्ट झाल्याचे कारण देत नुकसान भरपाईच्या नावाखाली 1 कोटींची खंडणी मागणार्‍या तरुणाला कांदिवली पोलिसांनी अटक केली आहे. अनिल ओझा असं या आरोपीचं नाव आहे. खंडणीची पहिली रक्कम घेताना पोलिसांनी त्याची रंगेहाथ अटक केली.kandivali_pizza33

कांदिवलीतील चारकोपच्या एकतानगर परिसरातील म्हाडा इमारतीमध्ये राहणार्‍या मयुर पाटील या एमबीएच्या विद्यार्थ्याने 4 एप्रिलला 2 शाकाहारी आणि मांसाहारी पिझ्झाची ऑनलाईन ऑर्डर दिली होती. त्यानुसारच्या कांदिवली महावीर नगर इथल्या पिझ्झा सेंटरमधून मयुर यांच्या घरी पिझ्झा पाठवण्यात आले. त्यानंतर काही तासांनी पिझ्झा खाऊन झाल्यानंतर मयुरचा मित्र अनिल ओझा याने पिझ्झा सेंटरच्या वेबपेजवर व्हेज पिझ्झाच्या ऐवजी नॉनव्हेज पिझ्झा पाठवल्याने माझा धर्मभ्रष्ट झाल्याची ऑनलाईन तक्रार केली.

त्यानुसार, पिझ्झा सेंटरचे मॅनेजर प्रशांत तांबे यांनी अनिल यांच्याशी संपर्क साधून अनिल याने नुकसान भरपाई म्हणून 1 कोटीची मागणी केली. अनिल 10 लाखावर तडजोड करण्यास तयार झाला. त्यानुसार तांबे यांनी पैसे स्वीकारण्यासाठी अनिलला चारकोपच्या पिझ्झा सेंटरमध्ये बोलवले. त्यावेळी 25 हजार रुपयांची खंडणी स्वीकारताना पोलिसांनी अनिलला रंगेहाथ अटक केलं. अनिल ओझा हा एमबीए शिकेल विद्यार्थी आहे आणि एवढा चांगलं शिक्षण असल्यावरही चुकीच्या पाऊल उचलल्या मुळे त्याला तुरुंगात जावं लागला.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा