संमेलनासाठी जय्यत तयारी

March 24, 2010 2:39 PM0 commentsViews: 1

24 मार्च83 व्या साहित्य संमेलनासाठी पुण्यात जय्यत तयारी सुरू आहे. संमेलनाचे उद्घाटन ज्येष्ठ साहित्यिक ना. धों. महानोर यांच्या हस्ते 26 मार्चला होणार आहे. आदल्या दिवशी 25 मार्चला ग्रंथदिंडी काढण्यात येणार आहे. एस. पी. ग्राऊंडवर संमेलनासाठी मंडप बांधण्याची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. 15 ते 20 हजार जण मावतील इतकी मंडपाची क्षमता आहे. संमेलनानिमित्त शहरात यापूर्वीच्या संमेलनांच्या आठवणीला उजाळा देणार्‍या 82 कमानींची उभारणी वेगवेगळ्या ठिकाणी करण्यात येत आहे. संमेलनानिमित्त निघणार्‍या ग्रंथदिंडीमध्ये 14 ते 15 पथके सहभागी होणार आहेत. त्यात महिला आणि शालेय विद्यार्थ्यांचा समावेश आहे. पारंपरिक वेशभूषा, पारंपरिक खेळ हे या दिंडीचे वैशिष्ट्य आहे.

close