‘सोळा वर्षांच्या मुलीला नोबेल दिला जातो त्या पुरस्काराला महत्त्व काय ? ‘

May 1, 2016 11:53 AM0 commentsViews:

shri_shri_ravishankar3लातूर – 01 मे : सोळा वर्ष वयाच्या मुलीला तिचे कामही न पाहता नोबेल पुरस्कार दिला जात असेल तर अशा पुरस्कारांचे महत्त्व ते काय ?, असा सवाल लआर्ट ऑफ लिव्हिंगगचे प्रमुख श्री श्री रविशंकर यांनी येथे उपस्थित केला. असं म्हणतं त्यांनी नोबेल समिती आणि मलाला युसुफजाईवर नाव न घेता निशाणा साधला आहे.

श्री श्री रविशंकर लातुरातील मांजरा नदीच्या खोलीकरण आणि रुंदीकरणाच्या कामाची पाहणी करण्यासाठी आले होते. त्यानंतर पत्रकारांनी त्यांना आपण शांततेच्या नोबेलसाठी प्रयत्न करत आहात का? असा सवाल केला. यावर, नोबेल पुरस्काराची ऑफर आली तरी आपण ती स्वीकारणार नाही, असंही श्रीश्री रविशंकर यांनी स्पष्ट केलं.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा