तिच्या आयुष्याची दोरी बळकट…

March 24, 2010 5:23 PM0 commentsViews: 4

24 मार्चदेव तारी त्याला कोण मारी…ही म्हण आपण नेहमी ऐकतो. पण या म्हणीचा प्रत्यय आज ठाणेकरांना आला. आईनं जंगलात टाकून दिलेल्या एक चार दिवसांची मुलगी आश्चर्यकारकरित्या बचावली आहे. विशेष म्हणजे जंगलात लागलेल्या वणव्यातूनही ही मुलगी वाचली आहे. वणवा विझवण्यासाठी गेलेल्या एका कर्मचार्‍याला ही मुलगी दिसली. आणि तिला त्याने या वणव्यातून बाहेर काढले. या मुलीला काही ठिकाणी जखमा झाल्या असून तिच्यावर सध्या सिव्हील हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

close