पावसानं मुक्काम वाढवल्यामुळे सोयाबीनची शेती करणारे शेतकरी अडचणीत आलेत

October 12, 2008 2:27 PM0 commentsViews: 20

12 ऑक्टोबर, – यावर्षी पावसानं आपला मुक्काम वाढवल्यामुळे अनेक शेतकरी अडचणीत आले आहेत. त्यातल्या त्यात नफा मिळवून देणारं पीक म्हणून सोयाबीन लागवडीकडे वळलेले शेतकरी सध्या चिंतेत आहेत. सोयाबीनला बाजारात योग्य तो भाव मिळत नसल्यानं शेतकरी चिंताग्रस्त आहेत. सोयाबीनचे भाव तब्बल हजार रुपयांनी घसरले. त्यातच यावर्षी सोयाबीन लागवडीपासून ते मळणीपर्यंतच्या खर्चात वाढ झाली. मध्यंतरी पावसामुळे शेतक•यांचं मोठं नुकसान झालं. आता भाव पडल्यानं शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. एप्रिल महिन्यांपर्यंत सोयाबीनला चांगला भाव होता. पण नवीन सोयाबीन बाजारात येताच भावात घसरण सुरू झाली. सध्या सोयाबीनला पंधराशे रुपये भाव मिळत आहे. सरकारनंच आता मदतीचा हात द्यावा अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करत आहेत.यंदा शेतक•यांनी मोठ्या प्रमाणात सोयाबीनची लागवड केली. पण भाव घसरल्यानं उत्पादनाचा खर्च निघण्याचीही शक्यता दिसत नाही.

close