वसई – विरार महापालिकेतून 35 गावे वगळणार

March 25, 2010 7:10 AM0 commentsViews: 110

25 मार्चवसई – विरार महापालिकेतून अखेर 35 गावे वगळण्यात येणार आहेत. नगरविकास राज्यमंत्री भास्कर जाधव यांनी आज विधानसभेत ही घोषणा केली. विधानसभेत सुरू असलेल्या वसईच्या मुद्यावर चर्चा करताना त्यांनी ही घोषणा केली. तर 13 गावे महापालिकेत जायला तयार असल्याची माहिती राज्य सरकारने दिली आहे. उरलेल्या पाच गावांची भूमिका अजून स्पष्ट झालेली नाही. वसई विरार महानगरपालिकेतून 53 गावे वगळावीत यासाठी वसई जनआंदोलन समितीने आंदोलन केले होते. यानंतर कोकण आयुक्तांनी दिलेल्या अहवालावर राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे.

close