काहीही झालं तरी शिवरायांचा महाराष्ट्र अखंडच ठेवणार -उद्धव ठाकरे

May 1, 2016 2:49 PM0 commentsViews:

मुंबई – 01 एप्रिल : हा शिवरायांचा महाराष्ट्र आहे. प्राण गेले तरी बेहत्तर असं म्हटलं जात आता प्राण गेला तरी महाराष्ट्र अखंड ठेवू असा इशारा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला. ते मुंबईत बोलत होते.

Uddhav-650आज राज्यभरात महाराष्ट्र दिनाचा उत्साह आहे. पण, या महाराष्ट्र दिनाला विदर्भवादी नेत्यांच्या आंदोलनामुळे गालबोट लागले आहे. नागपूरमध्ये स्वतंत्र विदर्भाचा झेंडा फडकावण्यात आलाय. तर यवतमाळमध्ये बसेसवर दगडफेक करण्यात आलीये. विदर्भावादी नेते विदर्भात काळा दिवस साजरा करत आहे. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा भाजप आणि विदर्भवादी नेत्यांना इशारा दिलाय.

शिवसेनेच्या वतीने मुंबई विमानतळाबाहेर शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोरहुतात्मा चौकाची प्रतिकृती उभारण्यात आली होतीहुतात्मा चौकाची प्रतिकृती उभारण्यात आलीये. यावेळी, उद्धव ठाकरे म्हणाले, हा छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र आहे. तो अखंड आहे. आजच्या दिवशी हुतात्मांनी आपल्या प्राणाची आहुती देऊन महाराष्ट्र मिळवून दिलाय. प्राण गेले तरी बेहत्तर असं म्हटलं जातं. आता महाराष्ट्र अखंड ठेवण्यासाठी प्राण गेले तरी चालतील पण अखंड ठेवू असा इशारा त्यांनी दिलाय. शिवसेनेनं वारंवार वेगळ्या विदर्भाच्या भूमिकेला कडाडून विरोध केलाय.आता होत असलेल्या वेगळ्या विदर्भाच्या आक्रमक आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी शिवसेना आता आक्रमकपणे रस्त्यावर उतरले असे संकेत दिले आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा