अणे, हे भाजपनं पुढे केलेले मोहरे -राज ठाकरे

May 1, 2016 3:03 PM0 commentsViews:

मुंबई – 01 मे: अणे, फुटाणे हे भाजपनं पुढे केलेले मोहरे आहेत. ही खरंतर भाजपचीच भूमिका आहे, महाराष्ट्र ही भूमिका कधीही मान्य करणार नाही अशा शब्दात मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा भाजप आणि विदर्भवादी नेत्यांना बजावलंय. तसंच हुतात्मा चौकात महाराष्ट्र दिन साजरा करायला लाज वाटते का ? असा टोलाही राज यांनी भाजप आणि शिवसेनेला लगावला.

raj_thackeryमुंबईत हुतात्मा चौकात राज ठाकरे यांनी हुतात्मांना आदरांजली वाहिली. यानंतर मीडियाच्या प्रतिनिधींशी बोलतांना राज ठाकरेंनी भाजप आणि श्रीहरी अणेंचा समाचार घेतला. कोण ते अणे की फुटाणे त्यांच्या काय भूमिका आहे त्या मागे भाजपचा हात आहे. वेगळा विदर्भही अणेंची नाहीतर भाजपची भूमिका आहे. भाजप फक्त मोहरे आहे अशी टीका राज ठाकरेंनी केली.

तसंच मला लाज या गोष्टीची वाटतीये की, दरवर्षी हुतात्मा स्मारक हे फुलांनी सजवलेलं असतं पण यावर्षी एकही फूल नाहीये. राज्य सरकाने हे सजवण्याचं काम आहे. उलट आघाडी सरकारच्या काळात इथं सजावट केली जायलीय. याबाबतीत भाजपपेक्षा काँग्रेसवाले परवडले. त्यांच्यावेळी हे सजवलेलं दिसायचं. जो मान स्मारकाचा राखयला हवा होता तो भाजप आणि शिवसेना दोघांनीही राखला नाही अशी नाराजीही राज ठाकरेंनी व्यक्त केली. तसंच भाजप आणि शिवसेनेनं महाराष्ट्र दिन मुंबईतील आंतराष्ट्रीय विमानतळाबाहेर शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर साजरा केलाय. त्यावर, महाराष्ट्र दिनाचा कार्यक्रम हा इथंच व्हायला हवा होता विमानतळापाशी नाही, बहुदा दोन्ही पक्षांना इथं येण्याची लाज वाटली असावी अशी टीकाही राज ठाकरेंनी केली.

त्याचबरोबर भाजपला महाराष्ट्राबद्दल कधीच काही देणंघेणं नव्हतं, मुंबई पालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेवून सगळे महाराष्ट्र दिन साजरा करणे सुरू आहे आणि मुंबई पालिकेचाही विषय नाही तर मुंबई पालिकेतले पैसे डोळ्यासमोर ठेवून सगळे सुरू आहे असा आरोपही राज यांनी केला.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा